भवानीगड किल्ला


पालघर तालुक्यातील पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकाहुन सुटणाऱ्या शटल ट्रेनने  किंवा लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे। सफाळे स्थानकाहुन रिक्षा वा बसने मधुकरनगर दहिसर स्टॉपवर उतरावे व साधारण एक ते दीड कि. मी. पायी अथवा मिळेल तय त्या वाहनाने भवानीगडांच्या पायथ्याशी पोहचता येते. १५० ते २०० फूट उंचीच्या टेकडीवर भवानीगड उभा आहे. गडाचा बहुतेक परिसर काजू, फणस , आंबा इत्यादी झाडी - झुडपांनी भरलेला आहे. गडाच्या पायथ्यापासून पाच मिनिटांचा चढ़ चढल्यावर भवानीगडांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहचता येते.
        ऐतिहासिक संदर्भानुसार जुलै १७३८ च्या प्रारंभी दोन हजार मराठ्यांनी दंडकातालच्या खताली   परगण्यात जाऊन केळव्यापासून दीड मैलावार असलेल्या जागी भवानीगडाची निर्मिती सुरु केली।कागदपत्रांत ६०० जंजीरे बराबर स्वारी मोराजी शिंदे देखील ४०० भवानीगडपैकी १००० बराबर मल्हारी आसाम्या अलीकडे आहेत,असा संदर्भ  मिळतो. त्या किल्ल्यास सात बुरुज व एक बालेकिल्ला होता. माहिम, केळवे , दातिवारे दळणवळणच्या मार्गावर वचक ठेवणारी भवानीगडांची टेकड़ी एकमेव आहे. एडवण ,कोरे , मथाने ,उसरणी इत्यादी चौकीमार्फत पोर्तुगीजांना पुरविण्यात येणारी रसद मोडणे या हेतूने भवानीगडांची निर्मिती करण्यात आली. दांडा किल्ला , कितल कोट , पोर्तुगीज वखार इ. केळवे प्रांतातील होणाऱ्या वाहतुकीवर व सैनिकी हालचालींवर नजर ठेवण्यास भवानीगड  महत्वाचा होता.
         भवानीगड   आज भवानगड  , भोंडगड , भुवनेश्वरगड ,भवनगड  ,भोनगड या नामावलीने ओळखला जातो. भवानीगडच्या इतिहाससाक्षी वास्तुविशेषात सात बुरुज, गोमुखी रणमंडळाचा बालेकिल्ला , भवानीगडावरील धान्य कोठार, ऋषिस्थान ,पाण्याचे टाके , चिरेबंदी भक्कम तटबंदी यांचा समावेश होतो. सध्या भवानीगडावर प्रसिद्ध असणारे शिवमंदिर शके १८३८ अनलनाम संवत्सरे माहे चैत्र शुद्ध १ म्हणजे इ. स. १९१७ मध्ये उभारण्यात आले. बालेकिल्ल्याच्या मुख्य बुरुजाच्या बांधकामात चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला आहे. भलेकिल्ल्याची लांबी १८८ फूट व रुंदी ७० फूट आहे. भवानीगडाचे रणमंडळ अभ्यासने दुर्गयात्रींसाठी आव्हान आहे. मराठेशाहीच्या गौरवशाली इतिहासाचा व भक्कम चिरबंदीबांधणीचा एक अनोखा किल्ला अभ्यासण्यासाठी भवानीगड  उत्तम साधन आहे.


  • नकाशा
इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment